आगामी विश्‍वचषकासाठी शमी हा भारताचा हुकुमाचा एक्का ठरु शकतो – आशिष नेहरा

नवी दिल्ली – गेल्या काही सामन्यांपासून मोहम्मद शमी चांगला खेळ करतो आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्येही तो मोठे स्पेल टाकतो आहे. त्याने आपल्या शाररिक तंदुरुस्तीवरही चांगले काम केले आहे. त्यामुळे आगामी विश्‍वचषकासाठी शमी हा भारताचा हुकुमाचा एक्का ठरु शकतो, असे मत माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहरा यांने व्यक्त केले आहे.

दरम्यान, मोहम्मद शमीने सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या सामन्यात 10 षटकांत 42 धावा देत 2 गडी बाद करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली होती. तर दुसऱ्या सामन्यात त्याला विकेट घेण्यात अपयश आले होते.

मोहम्मद शमीने आतापर्यंत 61 एकदिवसीय सामन्यात 110 विकेट आपल्या नावे केल्या आहेत. तर शमी 40 कसोटी सामने खेळला असून त्याने कसोटीत 144 विकेट घेतलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.