सध्या कोरोनाच्या काळात अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यासंदर्भात अनेक गोष्टी सुस्पष्ट करणारी शाॅर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महत्वाचं म्हणजे बॉलीवूडच्या लाडक्या जोडीने म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने या शाॅर्टफिल्ममार्फत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
दिवाळीच्या निमित्ताने ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्ममध्ये रितेश-जेनेलिया झळकणार आहेत. विशेष म्हणजे जगभरात आपला डंका वाजवणारी मराठमोळी संगीतकार द्वयी अजय-अतुल यांचं पार्श्वसंगीत याला लाभलं आहे
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हटलं जातं. यंदाही दिवाळीच्या आनंदाला तोटा नसला तरी कोरोना, लॉकडाऊन यामुळे समाजातील काही घटकांच्या मनातील उत्साहाला मात्र नेहमीची झळाळी बघायला मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ने ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख अशी तगडी मंडळी या मराठी शॉर्टफिल्मसाठी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत