Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

आषाढी वारी 2022 : बेलवाडीत पार पडले पहिले अश्वरिंगण

by प्रभात वृत्तसेवा
June 30, 2022 | 4:23 pm
A A
आषाढी वारी 2022 :  बेलवाडीत पार पडले पहिले अश्वरिंगण

इंदापूर (नीलकंठ मोहिते,प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षापासून खंड झालेला हरी नामाचा गजर, जणू काही मानवी शरीराला भक्तीचा सुखाचा ओलावा देतोय. याच आनंदात रिंगण सोहळ्यात चाललेल्या ज्ञानोबा माउली …. ज्ञानोबा माउली’ हा गगनभेदी नाम घोष, तर पखवाज यामधून येणारा एकसंध ताल, पंढरीच्या सावळ्या विठुरायाचा गजर करत धावणारे वारकरी आणि पताकावाले, हंडेवाल्या, तुलशिवाल्या भगिनी व विणेकरी टाळातून येणारा एकसंध आवाज, हरिनामाचा जयजयकार मेंढ्यांच्या प्रदक्षिणेने बेलवाडी(ता.इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळयांस सुरुवात झाली व मानाच्या अश्वाने क्षणाचा विलंब न लावता तब्बल पाच परिक्रमा पूर्ण करून लाखो लोकांच्या नयनांचे पारणे फेडले.

वैष्णवा संगती सुख वाटे जीवा !
अणीक मी देवा काहीं नेणें !
गायें नाचे उडे आपुलिया छंदे !
मनाच्या आनंदे आवडीने !

परंपरेनुसार बेलवाडी गावाला गोल रिंगणाचा पहिला मान यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाने गावाला बहाल केला. सणसर-गावच्या भैरवनाथ मंदिरातील मुक्काम आटपून पहाटेची महापूजा पादुकांची महापूजा गावकर्यांच्या हस्ते करण्यात आली. गुरुवार(ता ३० जून) रोजी पालखी सोहळा हरिनामाचा जयघोष करत, मानाच्या गोल रिंगणासाठी बेलवाडी येथे सकाळी ८.४२ वाजता दाखल झाला. इंदापूर – बारामती बेलवाडी कमानीजवळ गावातील श्रीराम भजनी मंडळ, रामकृष्णहरी भजनी मंडळ व गावकर्यांनी भजन म्हणत तोफांची सलामी देत पालखीचे स्वागत केले. छत्रपती शिक्षण संस्थेचे हिराबाई हरिभाऊ देसाई माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करत पावल्या खेळत,पालखी सोहळ्याचे उत्साही वातावरणात स्वागत केले. संत तुकाराम नगर येथे गोल रिंगणस्थळी पालखी हरिनामाच्या गजरात आणली.

यावेळी गावचे सरपंच माणिकराव जामदार, उपसरपंच रामचंद्र यादव,युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अँँड. शुभम निंबाळकर, छत्रपती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार,काररवान्याचे संचालक सर्जीराव जामदार,इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील,इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर,वालचंदनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे,
विठ्ठल जाचक,दादासो गायकवाड,लक्ष्मणराव भिसे,शहाजी शिंदे, हनुमंत खैरे व गावकऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

रिंगण सोहळा सुरू होण्याअगोदर मानाचा नगारा रिंगण स्थळी दाखल झाला. पालखी सोहळा सकाळी आठ वाजून २७ मिनिटांनी पालखी स्थळावर दाखल झाला.तदनंतर पालखीसमवेत पायी वारी करणारे वारकरी यांनी पखवाज वादन करण्यास सुरुवात केली.पखवाज मधून ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असा आवाज आसमंत दणाणून सोडत होता.याच आवाजाच्या मिलापाने टाळ चिपळ्या एकमेकांशी संवाद करतात याचा प्रत्यय उपस्थित असणाऱ्या लाखो भक्तगणांना आला.प्रथेप्रमाणे या भागातील मेंढपाळ प्रत्येक वर्षी आपण संभाळ केलेल्या मेंढ्या घेऊन या रिंगण सोहळ्यात उपस्थिती लावत असतात.याच पद्धतीने यंदाही आपल्या मेंढ्या सह पालखी राताला व पालखीला प्रदक्षिणा करत मानाची मेंढ्यांची प्रदक्षिणा करण्यात आली.

डोक्यांवर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी वाऱ्याच्या वेगाने रिंगण सोहळ्यात प्रदक्षिणा करीत होत्या.त्यापाठोपाठ मानाचे विणेकरी यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या.झेंडेकरी धावले,पालखीच्या मुख्य विश्वास्तांच्या सोबत गावकऱ्यांनी मानाच्या अश्वांची पूजा केली.व गोल रिंगण स्थळावर आश्वा सोबत प्रदक्षिणा केली.नाम घोष व हरिनामाने रिंगण सोहळ्याला चैतन्य निर्माण झाले होते.बघता – बघता उपस्थित असणाऱ्या नागरीकांनी वारकऱ्यांना सोबत फुगडीचे फेर धरले,बंदोबस्तासाठी उपस्थित असणाऱ्या पोलीस बंधूंनी देखील वारकऱ्यांच्या समवेत फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला.

याच विठ्ठल मंत्राच्या सान्निध्यातून जीवनात आनंद कमवायचा आहे.आपल्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी आलेला सीन घालवण्यासाठी,या चाललेल्या हरिनामा तून जनसमुदायाला समजत होते.रिंगणाचा खरा आनंद घेण्यासाठी अनेकांचे डोळे आतुरलेले होते.पालखी सोहळा सोबत चालणारे दोन अश्व रिंगण सोहळ्यात सोडण्यात आले.काही क्षणाचाही विलंब न लावता या दोन्ही अश्वांनी रिंगण सोहळ्याला पाच परिक्रमा केल्या,पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या नामघोषात रिंगण सोहळा पार पडला.

दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा बेलवाडी गावातील गावकऱ्यांनी भजनी मंडळांनी भजन गात मारुती मंदिरात आणला. यावेळी गावातील ग्रामस्थांनी जागोजागी अन्नदान केले, दुपारची न्याहारी घेऊन पालखी सोहळयाने लासुर्णे – जंक्शन- मार्गी अंथुर्णे
येथे मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

Tags: Ashadi Wari 2022belwadisant tukaram Palkhi sohla

शिफारस केलेल्या बातम्या

स्वच्छतेची वारी…पंढरपुरी
पिंपरी-चिंचवड

स्वच्छतेची वारी…पंढरपुरी

1 month ago
आषाढी वारी 2022 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा
महाराष्ट्र

आषाढी वारी 2022 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा

1 month ago
विठुनामाच्या घोषाबरोबरच व्यसनमुक्‍तीचाही जागर…
Top News

विठुनामाच्या घोषाबरोबरच व्यसनमुक्‍तीचाही जागर…

1 month ago
फिरता दवाखाना घेतोय वारकऱ्यांची काळजी…
Top News

फिरता दवाखाना घेतोय वारकऱ्यांची काळजी…

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

प्रशासकीय राजवट लांबणार?

निवडणुका सोबत लढणार की स्वबळावर?

पावसामुळे महिनाभरातच डांबरीकरण उखडले ! पुण्यातील कात्रज-दत्तनगर चौक रस्त्यावर खड्डेच खड्डे

माजी नगरसेवक गायकवाड यांच्याकडून पुण्यातील औंधमध्ये शालेय साहित्य वाटप

पुण्यातील हडपसरमध्ये स्कूलबसने घेतला पेट

पुणे महापालिकेने गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर

“स्वच्छ पुणे-सुंदर पुणे’… अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे

राजस्थान रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातून सायकलवारी

“हर घर तिरंगा’ अभियान “हर घर संविधान’शिवाय अपूर्ण ! डॉ. बाबा आढाव यांचे मत : मार्केट यार्डातील बाजार घटकांची बैठक

पुण्यातून जवानांसाठी 46 हजार राख्या रवाना

Most Popular Today

Tags: Ashadi Wari 2022belwadisant tukaram Palkhi sohla

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!