पिंपरी – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि.21) सकाळी देहूकरांचा निरोप घेत उद्योगनगरीच्या दिशेने वाटचाल केली. सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी सोहळ्याने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी येथे प्रवेश केला.
याठिकाणी महापालिका व नागरिकांनी या सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या सोहळ्याचे स्वागत करत, रथाचे सारथ्य केले. त्यानंतर महापालिकेच्या वतीने सहभागी दिंडीकऱ्यांना डायरी व प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.