Ashadhi Wari 2024 – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (दि.३०) शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होते.
या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवर राहणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत.
श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि.२८) प्रस्थान होणार आहे. तर, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि.२९) प्रस्थान होणार आहे. रविवारी (दि.३०) दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार आहे.
पालखी सोहळा रविवारी आणि सोमवारी शहरात मुक्कामी असणार असून मंगळवारी (दि.२५) पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे. नाना पेठेतील श्री निवडु्ंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे.
भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आणखी करण्यात आली असून सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात राहणार आहे