Ashadhi Wari 2024 । Tulsi Mala : तुळस या वनस्पतीला जसं आयुर्वेदात आणि हिंदू धर्मात मानाचं स्थान आहे तसंच तुळशी माळेलाही अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. अगदी वारकरी संप्रदायात तर तुळशी माळ घालणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग अर्थात विठ्ठल. ‘तुळशीमाळा गळा कर ठेवूनी कटी’, ही त्या विठ्ठलाची ओळख. त्यामुळेच वारकरी संप्रदायात तुळशीमाळेला अनन्य साधारण महत्व आहे.
एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की तो वारकरी शाकाहाराचा अवलंब करत मुखी विठ्ठलाचं नाम स्मरण करत आपलं आयुष्य जगतो. तसंच तुळशीची माळ घातल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळू शकतात. गळ्यात तुळशीची जपमाळ घातल्यास मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात. म्हणूनच तर आपण तुळशीची माळ परिधान करण्याचे फायदे आणि नियम जाणून घेणार आहोत…
तुळशीची माळ धारण केल्याचे फायदे –
तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र वनस्पती म्हणून पूजले जाते. हा लक्ष्मीचा अवतार असल्याचे म्हटले जाते. तुळशीची जपमाळ धारण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशीची माळ धारण केल्याने मन शांत होते.
यामुळे चिंता, तणाव आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो. तुळशीची माळ धारण केल्याने सौभाग्य वाढते. यामुळे माणसाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते. तुळशीची माळ धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
तुळशीची माळ घालण्याचे नियम –
तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी ती गंगाजलाने धुवावी व ती सुकल्यानंतरच धारण करावी. तुळशीची जपमाळ धारण करणाऱ्यांनी रोज जप करावा. यामुळे भगवान विष्णूची कृपा अबाधित राहते. तुळशीची माळ घालणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. मांसाहार आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. एकदा तुळशीमाळ गळ्यात घातल्यावर ती काढू नये.
तुळशीची माळ घालण्याची योग्य वेळ –
तुळशीची माळ घालण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी. सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर तुळशीची जपमाळ घालावी. यावेळी तुळशीच्या माळाचा प्रभाव जास्त असतो.
तुळशीची माळ धारण करण्याचे आणखी काही फायदे –
तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तो नेहमी आनंदी असतो. तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला सर्व कार्यात यश मिळते.
तुळशीची जपमाळ माणसाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि यश आणते. ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगले राहते. तुम्हालाही तुळशीची माळ घालायची असेल तर हे नियम अवश्य पाळा.