कंगना रणौतच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाचे आशादेवींनी केले समर्थन

नवी दिल्ली – वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांच्या विधानावर कंगना रणौत हिने संताप व्यक्त करताना वादग्रस्त विधान केले आहे. अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात, अशा शब्दांत कंगनाने जयसिंह यांच्यावर टीका केली आहे. मात्र कंगनाच्या या विधानाला निर्भयाची आई आशादेवी यांनी समर्थन केले आहे.

आशादेवी म्हणाल्या कि, मी कंगना रणौतच्या विधानाशी सहमत आहे. मी त्यांचे धन्यवाद करते. मला कोणत्याही प्रकारे महान व्यक्ती बनायचे नाही. मी एक आई आहे. आणि सात वर्षांपूर्वी माझ्या मुलीची हत्या झाली. मला केवळ न्याय पाहिजे आहे.

इंदिरा जयसिंह यांच्यावर टीका करताना आशादेवी म्हणाल्या कि, इंदिरा जयसिंह यांनी मला ज्याप्रकारे प्रश्न विचारला. ते मानव अधिकारांच्या नावाखाली एकप्रकारे समाजाला धोका देण्यासारखे आहे. अशी लोक मानवाधिकारांच्या नावाखाली बिझनेस चालवतात आणि केवळ आरोपींना सपोर्ट करतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here