आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी

नारायणगाव – लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्यांविरोधात शिवसेनेने कारवाई सुरू केली असून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि जुन्नरमधील शिवसेना नेत्या आशा बुचके यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवानंतर शिवसेनेने या पराभवाची गंभीर दखल घेत पुणे जिल्ह्यातील पक्ष संघटनेत बदल करण्याचे धोरण अवलंबून काहींना धक्का दिला, तर काहीची फेरनियुक्ती केली आहे. सेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांची नियुक्ती करण्यात आली. तर जुन्नर तालुका प्रमुखपदी माऊली खंडागळे यांची फेरनिवड केली आहे.

“मातोश्री’वरून झालेल्या या अचानक व धक्कादायक निर्णयामुळे जुन्नर तालुका शिवसेनेत खळबळ उडाली आहे. बुचके समर्थक या निर्णयामुळे तीव्र नाराज झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.