मलेशियाचे प्रधानमंत्री महाथीर मोहम्मद यांचे वक्तव्य
बॅंकॉक, दि. 3 – अमेरिका-चीन व्यापार वादावर तोडगा काढण्यासाठी अग्नेयकडच्या आशियाई देशांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे मलेशियाचे प्रधानमंत्री महाथीर मोहम्मद यांनी म्हटले आहे. ते काल थायलंड इथे उद्योग परिषदेत बोलत होते.
अमेरिका सरकारच्या धोरणावर अमेरिकेचे नागरीकही नाराज असून, ते या व्यापार वादाविरोधात आहेत, असेही ते म्हणाले. चीन-अमेरिका या महासत्ता देशांपर्यंत आपला आवाज पोचवायचा असेल, तर आसियान देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे महाथीर यांनी सांगितले. या दोन देशांमधल्या व्यापार वादामुळे आशियाई देशाच्या निर्यातीवर परिणाम झाल्याचे ते म्हणाले.