वेलिंग्टन: अमेरिकेची २३ ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने आॅकलंड क्लासिक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत मागील तीन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. ३८ वर्षीय सेरेना हिचे मागील तीन वर्षानंतरचे पहिलेचे विजेतेपद ठरले.
A first title in three years for @serenawilliams !
She beats Pegula 6-3, 6-4 at @ASB_Classic ! pic.twitter.com/EUnWlLAQQe
— wta (@WTA) January 12, 2020
स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सेरेनाने जेसिका पेग्युलाचा ६-३, ६-४ असा पराभव करत विजय संपादित केला. सेरेना हिने या विजेतेपदाची बक्षिसी रक्कम ऑस्ट्रेलियातील भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या तसेच त्याची झळ पोहोचलेल्या पीडितांच्या मदतीसाठी दिली आहे.
दरम्यान, सेरेनाने शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत अंमाडा एनीसिमोवाचा ६-१, ६-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे दुस-या उपांत्य फेरीत जेसिका पेग्युला हिने कॅरोलिन वाॅझ्नियाकी हिचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.