नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी नेहमीच आपल्या स्पष्ट आणि वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहतात. यावेळी देखील त्यांनी एक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. त्यांनी पोलिसांना धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एका प्रचारसभेत ओवेसी यांनी पोलिसांना धमकीवजा इशारा दिल्याचा आरोप आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ओवेसींनी स्पष्टीकरण दिले असून आपण पोलिसांना ही धमकी दिली नसल्याचे म्हटले आहे. आपल्या भाषणातील मोजका भाग एडिट करुन व्हायरल करण्यात आल्याचे ते म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून मुस्लीमांवर अत्याचार होत आहे, असं सांगत ओवेसी यांनी या प्रचारसभेत पोलिसांना धमकी दिल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा आरोप आहे. ‘योगी आदित्यनाथ हे नेहमी मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि नरेंद्र मोदी हे नेहमी पंतप्रधान राहणार नाहीत.
पोलिसांकडून मुस्लिमांवर अत्याचार होत असून हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही हा अन्याय लक्षात ठेवू. अल्लाह तुम्हाला त्याच्या शक्तीने नष्ट करेल. परिस्थिती बदलणार आहे. योगी पुन्हा मठात जातील आणि मोदी हिमालयात जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार?,’ असे ओवेसी म्हणाल्याचा दावा विरोधक करत आहेत.
In order to distract from #HaridwarGenocidalMeet, a clipped 1 min video is being circulated from 45 min speech I gave in Kanpur. I’ll set the record straight:
1. I did not incite violence or give threats. I talked about POLICE ATROCITIES Here’s the full video in TWO PARTS [Cont] pic.twitter.com/buZWZmVNLa
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 24, 2021
दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण होणारा वाद पाहून ओवेसी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ओवेसी यांनी आपल्या भाषणातील काही भाग काढून व्हायरल करत चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या ४५ मिनिटांच्या भाषणातील एक मिनिटांचा व्हिडीओ एडिट करुन व्हायरल करण्यात आला असे ते म्हणाले आहेत.
In order to distract from #HaridwarGenocidalMeet, a clipped 1 min video is being circulated from 45 min speech I gave in Kanpur. I’ll set the record straight:
1. I did not incite violence or give threats. I talked about POLICE ATROCITIES Here’s the full video in TWO PARTS [Cont] pic.twitter.com/buZWZmVNLa
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 24, 2021
“मी हिंसाचाराला चालना देणारी कोणतीही धमकी दिली नाही. मी केवळ पोलिसांच्या अत्याचाराबाबत भाष्य केले. पोलिसांकडून मुस्लिमांवर होणारा अत्याचार आक्षेपार्ह असून त्यांना कुणाचे संरक्षण मिळते? मोदी व योगी यांचे का?,” असा सवाल विचारला. मात्र सोशल मीडियावर चुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, असे ओवेसी म्हणाले.
दरम्यान ओवेसींच्या या भाषणावर विरोधकांनी टीका केली असून शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वैदी यांनी हे लाजिरवाणं असल्याचे म्हटले आहे. तर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली असून त्यांची तुलना मुहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे.