नवी दिल्ली – हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने मुलींची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले की, हिजाब हा धर्माचा अत्यावश्यक भाग नाही. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये गणवेश घालण्यास नकार देता येणार नाही. इस्लाममध्ये हिजाब घालणे अनिवार्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
यावर पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून मुस्लीम समाजासोबत अन्याय होत आहे असे म्हटले आहे. संपूर्ण देशभरात या निर्णयावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे. याच निर्णयावर आता AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे
त्यांनी ट्विट केले आहे की,’हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी सहमत नाही. या निकालाशी असहमत असणे हा माझा अधिकार आहे.’
काय आहे असदुद्दीन ओवेसी यांचे ट्विट
1. I disagree with Karnataka High Court’s judgement on #hijab. It’s my right to disagree with the judgement & I hope that petitioners appeal before SC
2. I also hope that not only @AIMPLB_Official but also organisations of other religious groups appeal this judgement…
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) March 15, 2022