तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी आक्रमक

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तिहेरी तलाक विधेयक मांडलं. त्यानंतर तिसऱ्यांदा मांडण्यात आलेल्या तिहेरी तलाक विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या मतदानामध्ये हे विधेयक 74 विरुद्ध 186 मतांनी पास करण्यात आले.

यावेळी असदुद्दीन ओवेसी, शशी थरुर यांच्यासह अनेक नेत्यांनी कडाडून विरोध करण्यात आला. रविशंकर प्रसाद यांनी गोंधळात विधेयक माडलं.

विधेयकाला विरोध करताना ओवेसी म्हणाले, ‘मुस्लीम महिलांबद्दल प्रेम दाखवता. मग शबरीमालाला विरोध का? असा सवाल सरकारला केला. तसंच पतीला तुरूंगात टाकल्यानंतर पत्नीला पोटगी कोण देणार ‘? असा सवाल देखील यावेळी ओवैंसी यांनी उपस्थित केला.

पुढे ओवैंसी म्हणले की, ‘तिहेरी तलाकवरील विधेयक मुस्लिम महिलांच्या विरोधात आहे’. या प्रकरणात जर गैर मुस्लिम व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर त्याला एक वर्षाची शिक्षा आणि मुस्लिमावर गुन्हा झाल्यास त्याला तीन वर्षांची शिक्षा देण्यात येणार आहे. हे संविधानाच्या 14 आणि 15 व्या तरतुदीचे उल्लंघन नाहीय का, असा सवाल ओवेसींनी विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.