नगर: नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज नगर शहराजवळ असलेल्या नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर येथील एकाचा अहवाल पॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहचली असून, नगरकरांसह प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आज सकाळी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या 73 स्राव चाचणी नमुन्यापैकी 39 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील शहराजवळील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर येथील 31 वर्षीय युवकाचा अहवाल करोना पॅझिटिव्ह आला आहे. तसेच 38 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरुंबिकर यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना जिल्ह्या प्रशासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रशासनही सतर्क झाले आहे.