पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

पुणे – पुणे जिल्हाधिकारी पदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून त्यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी काढण्यात आले.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. त्यामुळे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पुणे जिल्हाधिकारी पदी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यामध्ये प्रामुख्याने डॉ. देशमुख यांचेच नाव आघाडीवर होती. अखेर शासनाने पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. दरम्यान डॉ. देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे.

त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या ते हाफकीन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.