भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने जवानाने थेट मंत्र्याला दिली जीवे मारण्याची धमकी

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात टाइम घातले आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

यातच  हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याच्या रागात जवानाकडून थेट मंत्र्यांना धमकी देण्यात आली आहे. हि  घटना हरयाणातील रेवडी जिल्ह्यात घडली आहे. 

एका जवानाच्या कोरोनाग्रस्त लहान भावाला ऑक्सिजन सिलिंडरची होती. मात्र  ऑक्सिजन सिलिंडर च्या तुटवड्यामुळे जवानाने एक व्हिडियो काढला आहे. या व्हिडियोमध्ये गुरुग्रामचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह  यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

यामध्ये त्या जवानान  म्हटलं आहे की,’माझ्या लहान भावाला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. मी रेवाडीत शोधलं पण एकाही ठिकाणी मला ऑक्सिजन सिलिंडर मिळाला नाही. गुरुग्राममधून मला 70 हजार रुपयांना ऑक्सिजन सिलिंडर घ्यावा लागला’

 सध्या हा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.  दरम्यान, हा व्हिडियो च्यारलं होताच स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या जवानाविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.