आयपीएलचा लिलाव संपताच ‘या’ खेळाडूला आला होता, विराटचा मेसेज….

नवी दिल्ली – कोरोनाच्या महामारीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मोहम्मद अझरुद्दीन केरळ संघाकडून खेळताना फक्त 37 चेंडूत शतकी खेळी केली होती. त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन हा प्रकाश झोतात आला. 

त्याला यंदा झालेल्या चौदाव्या आयपीएलच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. बेंगलोर संघाने मोहम्मद अझरुद्दीनला त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपयेमध्ये खरेदी केले.

टाइम्स ऑफ़ सोबतच्या चर्चे दरम्यान मोहम्मद अझरुद्दीनने सांगितले की, त्याला आयपीएल स्पर्धेच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील केल्यानंतर, त्याला विराट कोहलीचा मेसेज आला होता.
मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला, “लिलाव सुरू असताना मी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या बायो – बबल मध्ये होतो. या लिलावावर मी नजर ठेवून होतो.

आयपीएलचा लिलाव संपताच दोन मिनिटांच्या आत विराट कोहलीने मला मेसेज केला. “विराट कोहलीने लिहले होते, आरसीबी मध्ये आपले स्वागत आहे. ऑल द बेस्ट. मी विराट कोहली बोलत आहे.”

मोहम्मद अझरुद्दीन पुढे म्हणाला, “मी हा मेसेज पाहिल्यानंतर थोडा गोंधळलो होतो की खरचं हा विराट कोहलीचा फोन नंबर आहे का? मी लगेच या मेसेजचे उत्तर दिले नाही आणि संजू सॅमसनकडे गेलो आणि याबद्दल विचारले . त्यानंतर मी उत्तर दिले. मी उत्तर दिले की ‘हे माझ्यासाठी सर्व काही आहे. “

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.