पुणे – मुलीने तीच्या मैत्रीणीच्या मोबाईलवरुन वडिलांना फोन केला. मात्र ट्रु कॉलरवर पुष्पराज नाव आल्याने मुलीने बॉयफ्रेंडच्या मोबाईलवरुन फोन केल्याचा संशय वडिलांनी घेतला. यानंतर मुलीला फरशी पुसण्याच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मुलीला सोडविण्यास गेलेल्या घरातील सदस्यांनाही लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी खडकी पोलिसांनी विजय बबन काची (45,रा.महादेववाडी, खडकी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी अनिता विजय काची (40) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अनिता यांच्या मुलीने मैत्रीणीच्या मोबाईलवरुन वडिलांना फोन केला होता.तेव्हा ट्रु कॉलरवर पुष्पराज असे नाव आले होते.
यावरुण त्यांना मुलीने कोणत्यातरी मुलाच्या फोनवरुन फोन केला असा संशय घेतला. यातूनच घरी आल्यावर त्यांनी मुलीला फरशी पुसण्याच्या लाकडी दांडक्याने दंडावर, पोटावर, छातीवर आणि पाठीवर बेदम मारहाण केली. तीला सोडविण्यासाठी फिर्यादी आई आली असता तीलाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर त्यांची लहान मुलगी सोडविण्यास आली असता तीलाही लाकडी मारहाण केली. फिर्यादीचे सासरे मध्य पडले असात, त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोळ्याच्याखाली जखम झाली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.