नेवासा: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात दोन बलाढ्य राजकीय शक्तीशाली माजी मत्र्यांनी आपल्या गनिमीकाव्याची प्रचिती दाखवत ऐनवेळी पराभवाचा राजकीय झटका देवून संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील या आपल्या दोन सवंगड्यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करुन राज्याच्या राजकारणात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपला राजकीय करिष्मा दाखवून दिला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही राज्याच्या राजकारणात चांगलाच आश्चर्याचा झटका दाखवून दिलेला आहे.
त्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील हे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ या दोन आपल्या सवंगडी आमदारांना कायमच बरोबर घेवून मंत्रालयात फिरताना दिसून येत असतानाच मंगळवारी (दि.१८) रोजी मंत्रालयात विखे – पाटील यांच्याशी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि आमदार अमोल खताळ चर्चा करत असताना समोरुन कॉंग्रेसचे नेते नाना पटोले आणि राज्याचे माजी मंत्री अब्दूल सत्तार आले.
राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या नव्या दमाच्या दोन आमदारांची ओळख कॉंग्रेसचे दिग्गज नेते आमदार नाना पटोले आणि माजी मंत्री अब्दूल सत्तार यांच्याशी ओळख करुन दिली आणि झालेल्या ओळखीतून पुन्हा विखे – पाटील यांच्या राजकीय करिष्म्याची पुन्हा एकदा जोरदार चांगलीच चर्चा मंत्रालयात रंगल्याचे पाहायला मिळाले.
राज्याच्या राजकारणात विखे – पाटील घराण्याचा नेहमीच राजकीय दबदबा आजपर्यंत कायम रहात आलेला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी बलाढ्य उमेदवार असलेले राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री शंकरराव गडाख या दोन मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या गनिमीकाव्याने विरोधकांना नमोहरण करण्याची राजकीय व्युहनिती आणि चाल यशस्वी करुन विखे – पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य घराण्यातील आपले दोन शिलेदार संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांना विजयी केले. राज्याच्या राजकारणात चांगलेच पुन्हा एकदा चर्चेचे काहूर पेटलेले असतानाच आता पुन्हा विखे – पाटील यांनी संगमनेर आणि नेवासा मतदार संघात लक्ष घालून आपल्या या दोन नव्या सवंगड्यांना चांगलीच रसद आणि ताकद पुरविताना दिसून येत असल्याची जोरदार चर्चा होत आहे.