मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे पवार यांनी सांगितले असून काळजीचे कोणतेही कारण नाही असे ते म्हणाले आहेत. डॉक्टराच्या सल्ल्यानुसार पवार उपचार घेत आहेत. याशिवाय संपर्कात आलेल्यांना पवारांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
शरद पवारांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच सर्व पक्षातील नेत्यांकतडून त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यात येत आहे. तसेच लवकर बरे व्हा अशा सदिच्छा पण देण्यात येतायत.
शरद पवारांना करोनाची लागण झाल्याचे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने त्यांना फोन करून विचारपूस केली. काळजी घेण्याचा सल्ला देत शुभेच्छा व्यक्त केल्या. या संदर्भात खुद्द शरद पवार यांनीच ट्विट करून माहिती दिली.
Prime Minister Shri Narendra Modi ji called to enquire about my health. I am thankful for his concern and good wishes.@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी दाखवलेली काळजी आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं. ८१ वर्षीय शरद पवार यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असून