नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे दिल्ली सराफात सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी बरीच वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 251 रुपयांनी वाढून 51,056 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 862 रुपयांनी वाढून 54,934 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,719 डॉलर व चांदीचा दर 18.52 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
सोने आणि चांदीची दरात वाढ झाल्याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे सोन्याचे दर अस्थिर राहणार आहेत. युरोपामध्ये ऊर्जा संकट निर्माण झाल्यामुळे सोन्याचे दर काही दिवसापासून वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.