गुगल क्‍लासरुमच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी राज्यातून तब्बल 1 लाख 34 हजार शिक्षकांची नोंदणी !

पुणे, मुबंईतील शिक्षक नोंदणी करण्यात अव्वल

पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना गुगल क्‍लासरूमचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातून तब्बल 1 लाख 34 हजार 376 शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यातही पुणे, मुंबईतील शिक्षकांनी सर्वाधिक नोंदणी करत अव्वल स्थान पटकाविले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबतच्या सूचना शासनाकडून शाळांना देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना मूल्यमापन करता यावे व शिक्षकांच्या अध्यापन, गृहपाठ, सूचनांचा त्याच्या सोयीनुसार लाभ घेता यावा यासाठी गुगल क्‍लासरूम मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शासकीय व खासगी अशा सर्वच शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचे नियोजन उपसंचालक विकास गरड करीत आहेत.

या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ संपली आहे. नोंदणीसाठी शिक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून नोंदणी केलेल्या सर्वच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईतून 9 हजार 135 तर पुणे जिल्ह्यातून 8 हजार 765 शिक्षकांनी सर्वाधिक नोंदणी झाली आहे.

प्रत्येक शिक्षक, विद्यार्थ्यांना शाळेसाठी आयडी तयार करून देण्यात येणार आहे. त्याच्या सहाय्याने शिक्षक एकावेळी 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तासिका घेऊ शकतात. तासिका रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना कधीही पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात.

 जिल्हानिहाय प्रशिक्षणासाठी शिक्षकांनी केलेली नोंदणी

अहमदनगर-3922, अकोला-3471, अमरावती-2881, औरंगाबाद-4825, भंडारा-1268, बीड-3106, बुलढाणा-1726, चंद्रपूर-2774, धुळे-3911, गडचिरोली-1939, गोंदीया-1695, हिंगोली-2218, जळगाव-4435, जालना-1804, कोल्हापूर-3020, लातूर-3858, मुंबई-9135, नागपूर-2385, नांदेड-2738, नंदूरबार-1717, नाशिक-6906, उस्मानाबाद-456, पालघर-2409, परभणी-2581, पुणे-8765, रायगड-3081, रत्नागिरी-1929, सांगली-3817, सातारा-7508, सिंधुदुर्ग-1087, सोलापूर-3877, ठाणे-6706, वर्धा-1404, वाशिम-1277, यवतमाळ-146.
—————

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.