Amit Shah on Rahul Gandhi | लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान आरक्षण संपवण्याबाबत मोठं वक्तव्य केले. सध्या त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले. मात्र राहुल गांधी यांनी मांडलेल्या या भूमिकेनंतर केंद्रीय गृहमंत्री व भाजपा खासदार अमित शाह यांनी एक ट्वीट केले आहे.
काय म्हणाले अमित शाह? Amit Shah on Rahul Gandhi |
अमित शाह यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “देशविरोधी बोलणं आणि देशाला तोडणाऱ्यांच्या बरोबरीने उभं राहणं ही राहुल गांधी व काँग्रेसची सवयच झाली आहे. मग तो जम्मू-काश्मीरमध्ये जेकेएनसीच्या देशविरोधी व आरक्षणविरोधी अजेंड्याला समर्थन देणं असो किंवा मग विदेशातील व्यासपीठांवर भारताच्या विरोधात बोलणं असो, राहुल गांधींनी देशाची सुरक्षा व भावनांना कायम धक्का पोहोचवला आहे”, असे अमित शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
“भाषेवरून, प्रांतावरून किंवा धर्मावरून भेदभाव करणाऱ्या गोष्टी बोलणं यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचेच विचार दिसतात. राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विधान करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशाच्या समोर आणण्याचं काम केलं आहे. मनातले विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात”, अशा शब्दांत अमित शाह यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. Amit Shah on Rahul Gandhi |
देशविरोधी बातें करना और देश को तोड़ने वाली ताकतों के साथ खड़े होना राहुल गाँधी और कांग्रेस पार्टी की आदत सी बन गई है। चाहे जम्मू-कश्मीर में JKNC के देशविरोधी और आरक्षण विरोधी एजेंडे का समर्थन करना हो, या फिर विदेशी मंचों पर भारत विरोधी बातें करनी हो, राहुल गाँधी ने देश की सुरक्षा…
— Amit Shah (@AmitShah) September 11, 2024
आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमित शाह यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. “मी राहुल गांधींना हे सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजपा आहे, आरक्षणाला कुणी हातही लावू शकत नाही. भाजपा आहे तोपर्यंत देशाच्या एकात्मतेशी कुणीही खेळू शकत नाही”, असं अमित शाह यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. Amit Shah on Rahul Gandhi |
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले, ‘तुम्ही आर्थिक आकडेवारी पाहता, आदिवासींना 100 रुपयांपैकी 10 पैसे, दलितांना 100 रुपयांपैकी 5 रुपये आणि ओबीसींनाही जवळपास तेवढीच रक्कम मिळते. त्यांना सहभाग मिळत नसल्याचे वास्तव आहे. भारतातील प्रत्येक व्यावसायिक नेत्याची यादी पहा. मला आदिवासी आणि दलितांची नावे दाखवा. मला ओबीसीचे नाव दाखवा. मला वाटते टॉप 200 पैकी एक ओबीसी आहे. ते भारतातील 50टक्के आहेत, पण आपण हा आजार बरा करत नाही आहोत. आता आरक्षण हे एकमेव साधन नाही. इतरही माध्यमे आहेत.” सध्या राहुल गांधी यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
हेही वाचा:
किरीट सोमय्या यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारली; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ‘कोणाला विचारून…”