मुंबई – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 च्या अंतिम सामन्यासाठी व इंग्लंड दौऱ्यासाठीही नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. निवड समितीने निवडलेल्या संघात राखीव खेळाडू म्हणून 23 वर्षीय गोलंदाज अर्जन नागवासवाला याचीही निवड करण्यात आली आहे. तो मूळचा गुजरातचा आहे. त्याच्या निवडीबरोबरच 46 वर्षांत इतिहास घडलाय.
मूळचा गुजराती असलेला अर्जनचं वय वर्ष केवळ 23 आहे. 46 वर्षानंतर प्रथमच भारतीय संघात निवड झालेला तो पहिला पारशी खेळाडू आहे. अर्जन अगोदर फारुख इंजिनिअरभारतीय संघात खेळले होते. त्यानंतरच्या कोणत्याही पारशी खेळाडूला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकली नाही किंबहुना पारशी खेळाडू भारतीय संघाचं दार ठोठावू शकले नाहीत.
Arzan Nagwaswalla is a new addition in the #TeamIndia squad as a standby player. @GCAMotera
Watch this to know what he is capable of 🎥 👇
— BCCI Domestic (@BCCIdomestic) May 7, 2021
अर्जन नागवासवाला गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील नारगोल गावचा रहिवासी आहे. त्याने गुजरातसाठी 16 फर्स्ट क्लास, 20 लिस्ट ए आणि 15 टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे 62, 39 आणि 21 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघात शेवटची पारशी महिला क्रिकेटर म्हणून डायना एडुल्जी यांचं नाव घ्यावं लागेल. त्या शेवटच्या पारसी महिला क्रिकेटर होत्या ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतरच्या 28 वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघात देखील पारशी महिल क्रिकेटरने इन्ट्री मिळवलेली दिसून येत नाही. डायना एडुल्जी यांनी 1993 साली त्यांची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती.