बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर सोशल मीडियावर पुनरागमन केले आहे. आर्यन खानची बहीण सुहाना खान ‘द आर्चिज’ चित्रपटातून डेब्यू करणार आहे. आर्यन खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘बेबी सिस्टर’ला चित्रपट पदार्पणाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
शनिवारी सकाळी चित्रपट निर्मात्या झोया अख्तर आणि नेटफ्लिक्सने ‘द आर्चीज’ चित्रपटाची घोषणा केली. यासोबतच या चित्रपटातून एक नव्हे तर तीन स्टार किड्स डेब्यू करणार असल्याचे सांगण्यात आले. सुहाना खान व्यतिरिक्त यात बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील आहे.
शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खानने अभिनय विश्वात प्रवेश केला आहे. या चित्रपटात मिहीर आहुजा, युवराज मेंडा आणि वेदांग रायना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘द आर्चीज’चे पोस्टर शेअर करताना आर्यन खानने पहिली पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने लिहिले, “शुभेच्छा बेबी sis. गो किक सम ass. चित्रपटाचा टीझर छान दिसत आहे. प्रत्येकजण शानदार दिसत आहे.”
आर्यन खान इंस्टाग्रामवरून बरेच दिवस ब्रेक घेतला होता. अटक आणि जामीन झाल्यानंतर आर्यन खान सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने एक महिना न्यायालयीन कोठडीत काढला. नंतर त्यांला जामीन मिळाला. दर शुक्रवारी आर्यन NCB कार्यालयात हजेरी लावण्यासाठी जावे लागे. या संपूर्ण प्रकरणात आर्यन खान खूप ट्रोल झाला होता. त्याच वेळी आर्यन खान आणि शाहरुख खानसह गौरी खानला चाहत्यांकडून आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचा पाठिंबा मिळाला.