आर्यन खानला दिलासा नाहीच; जामीन अर्जावर उद्या पुन्हा होणार सुनावणी

मुंबई – क्रूज ड्रग्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज पुन्हा एकदा विशेष एनडीपीएस कोर्टात सुनावणी पार पडली. या जामीन अर्जावरील सुनावणी जवळपास तीन तास चालली आणि कोणताही निर्णय आला नाही. आता यावर उद्या, गुरुवारी सुनावणी होणार असल्याने आर्यन खानला तुरुंगातून बाहेर येण्याची वाट पाहावी लागणार आहे.

क्रूज ड्रग्स प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसल्याच्या कारणाने दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयात आले आहे. शाहरुख खानने वकील सतीश मानशिंदे यांना बाजूला करत नवीन वकील अमित देसाई यांची नियुक्ती केली आहे.

जामीन अर्जाची नोटीस दिल्यानंतर, नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ड्रग्जच्या प्रकरणात अनेक जामीन याचिका प्रलंबित असल्याने एजन्सीला उत्तर दाखल करण्यासाठी किमान एक आठवड्याचा अवधी हवा आहे.

आर्यन खानवर एनसीबीने आरोप केला आहे की तो परदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता जे बेकायदेशीर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा भाग असल्याचे दिसते आणि तपास चालू आहे. जामीन मिळाल्यास तो देश सोडून जाऊ शकतो या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असेही एनसीबीने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.