मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत बातम्यांमध्ये झळकत असतो. आर्यनचे ड्रग्ज प्रकरण मिटल्यानंतर तो बॉलिवूड पार्ट्यांमध्ये सतत दिसत असल्यामुळे चर्चेत आला होता. कधी तो नव्या करिअरला सुरुवात करणार असल्यामुळे चर्चेत येतो तर कधी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चांमुळे प्रसिद्धी झोतात येतो. सध्या एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचा आर्यन खानचा एक फोटो जोरदार व्हायरल होतोय.
पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान आणि आर्यन खानचा व्हायरल फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्यामुळे आर्यन आता नोराला नाही तर सादियाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हा फोटो नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. फोटोमध्ये आर्यन पांढऱ्या जॅकेटमध्ये दिसत असून सादिया ब्लॅक ड्रेससह हॉट लूकमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
दोघांचाही फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. सादिया गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. चित्रपट,टीव्ही मालिकांसह सादियाने अनेक शोजमध्ये देखील काम केले आहे. आर्यन आणि सादियाच्या भेटीचे कारण सध्या अस्पष्ट आहे. आर्यन सध्या बोलीववूड पदार्पणासाठी सज्ज असून लवकरच तो दिग्दर्शक म्हणून एंट्री करणार आहे.