Aryan Khan drugs case: आर्यन खानची जामिनासाठी धावाधाव; आज सुनावणीची शक्‍यता

मुंबई  -क्रुझवरील मादक द्रव्याच्या संबंधात अटक करण्यात आलेला आर्यन खान याचा जामीन अर्ज एनडीपीएस कोर्टाने फेटाळला आहे. तसेच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले. 

या निर्णयाविरोधात आर्यन खानने एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

आर्यन खानने हायकोर्टात धाव घेतली असली तरी त्याला ऑर्थररोड कारागृहातच राहावे लागणार आहे. या कोर्टाने काल आपला निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल जाहीर करण्यात आला.

आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते आता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहे, असे म्हटले होते. काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन आणि मर्चंट मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि धामेचा भायखळा महिला कारागृहात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.