मुंबई – आर्यन खानने अद्याप कोणताही चित्रपट केलेला नाही. शाहरुखचा मुलगा याव्यतिरिक्त त्याची वेगळी ओळख देखील नाही. परंतु तरीही आज आर्यनचे अनेक फॉलोवर्स आहेत. कारण तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात आर्यन गरबा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. पण हे सत्य मानण्यापूर्वी हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे.
व्हिडिओमध्ये एक मुलगा गरबा डान्स करताना दिसतोय. अगदी ताला सुरत तो गरबा करत आहे. नेटकरी देखील त्याचा हा डान्स पाहून त्याच कौतुक करत आहेत. अनेकांनी हा मुलगा आर्यन खान असलयाचे म्हंटले आहे. म्हणूनच हा व्हिडीओ जुना असूनही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु हा मुलगा आर्यन खान नसल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram
आर्यन खानप्रमाणे लूक असलेला हा मुलगा बनी राजपूत आहे. बनीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो गरबा करताना दिसत असून त्याची स्टाइल खूपच अप्रतिम आहे. बनी राजपूतने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये सांगितले आहे की तो एक अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आहे. तर अनेकांनी त्यावर कमेंट करत आर्यन खान सारखा लूक असल्याचे म्हंटले आहे.