महाराष्ट्राच्या आर्यमानचे गोल्फ स्पर्धेत यश

पुणे: राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्राकडून एकमेव पदक पटकावण्याची कामगिरी पुण्याचा युवा गोल्फपटू आर्यमान सिंग याने केली आहे.

जमशेदपूर येथील गोलमुरी गोल्फ कोर्स येथे 15 ते 18 ऑक्‍टोंबर या कालावधीत आयजीयु झारखंड गोल्फ अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली.

पहिल्या काही फेऱ्यांमध्ये खराब फटके खेळल्यामुळे पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेल्या आर्यमान अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये कमालीची झुंज देत जबरदस्त पुनरागमन केले आणि पदकांपर्यंत मजल मारली.

आर्यमानने अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करताना अखेरच्या 12 होलमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावली आणि अखेर संयुक्त दुसरे स्थान पटकावले. केवळ 12 वर्षे वयाच्या आर्यमानने राष्ट्रीय स्तरावरील गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्राकडून पटकावलेले हे तिसरे पदक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.