Aryaman Birla : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेला 22 वर्षीय खेळाडू आर्यमन बिर्ला याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्याकडे सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांपेक्षा जास्त पैसा आहे जे देशातील सर्वात मोठे ब्रँड बनले आहेत. देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूबदल बोलायचे झाले तर आर्यमन बिर्ला याचा पहिल्या क्रमांक येतो. आर्यमन बिर्ला (aryaman birla) हा कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांचा मुलगा आहे. आर्यमन बिर्लाने वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी क्रिकेटला अलविदा केले आहे.
आर्यमन बिर्ला याची एकूण संपत्ती ₹70,000 कोटी आहे जी कमाईच्या बाबतीत सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यापेक्षा पुढे आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक कुटुंबांपैकी एक आहे.
आर्यमनची कारकिर्द…..
क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, आर्यमन बिर्लाने 2017-18 च्या हंगामात मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. साल 2018 इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये 30 लाखांना विकत घेतल्यानंतर तो राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला.
ईएसपीएन क्रीकइन्फो ESPNcricinfo नुसार, आर्यमनने नऊ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 414 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि एक अर्धशतक आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये चार सामने देखील खेळले आहेत आणि त्यात फक्त 36 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर, 2019 मध्ये वैयक्तिक कारणांमुळे आर्यमन व्यावसायिक क्रिकेटपासून दुरावला.
त्याने राजस्थान रॉयल्ससोबत दोन हंगाम घालवले पण त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करता आले नाही. यानंतर त्याला फ्रँचायझीने रिलीज केलं. आजवर देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आर्यमन बिर्लाला टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकली नाही. आता त्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.