जयललितांच्या बायोपिकमध्ये “एमजीआर’ बनणार अरविंद स्वामी

बॉलिवुडची क्वीन कंगणा रणावत सध्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकची जोरात तयारी करते आहे. या बायॉपिकचे नव “थलाइवी’ असेल. कंगणा या सिनेमासाठी भरतनाट्यम, तमिळ शिकते आहे. त्याशिवाय तिचे प्रोस्थेटिक मेकअप वापरणे देखील चालू आहे. सर्वांना माहिती आहे की जयललिताची कहाणी ऍक्‍टर आणि तमिळ राजकीय नेते एम,जी. रामचंद्रन यांच्याशिवाय अपूर्ण आहे. जयललितांना राजकारणात आणणे आणि पुढे प्रगतीपथावर नेण्यामध्ये “एमजीआर’ यांची महत्त्वाची भूमिका होती.

तामिळ सुपरस्टार अरविंद स्वामी चित्रपटात “एमजीआर’ यांचा रोल करणार आहे. “एमजीआर’ आणि जयललिता यांनी 1965 ते 1973 दरम्यान 28 सुपर सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. निर्मात्यांना “एमजीआर’च्या रोलसाठी असा ऍक्‍टर हवा होता ज्याला हिंदीशिवाय तामिळ आणि तेलगु भाषा देखील बोलता येत असेल. अरविंद या तिन्ही भाषा एकदम अस्खलितपणे बोलू शकतो.

कंगणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून म्हैसूरमध्ये या सिनेमाच्या शुटिंगला प्रारंभ करणार आहे. तर अरविंद 15 नोव्हेंबरपासून आपल्या शुटिंगला प्रारंभ करणार आहे. या सिनेमात जयललिताच्या किशोरावस्थेपासून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.