अरविंद सावंत बनणार केंद्रीय मंत्री; शिवसेनेकडून दुजोरा

मुंबई – केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांचे नाव निश्‍चित झाले आहे. यावेळी ते मंत्रिमंडळात अनंत गिते यांची जागा घेतील, अशी माहिती शिवसेनेच्या सुत्रांकडून देण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मावळत्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचे प्रतिनिधित्व गिते यांनी केले. मात्र, त्यांना यावेळी रायगड मतदारसंघात पराभूूत व्हावे लागले. आता सलग दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा मान मिळणार आहे. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा पराभव केला. सावंत हे कामगार चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांना याआधी शिवसेनेने महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. सध्या ते शिवसेनेचे उपनेते आहेत.

https://twitter.com/ANI/status/1133950741242998784

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)