मोदींनी बडतर्फ केलेला जवान मोदींच्या विरोधात उभा करण्यास केजरीवालांचे समर्थन

नवी दिल्ली – मोदी सरकारने क्षुल्लक कारणावरून बडतर्फ केलेले सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादुर यादव यांना सपा-बसपा आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्या उमेदवारीचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी समर्थन केले आहे. तेजबहादुर हे मुळचे हरियानाचे आहेत.

हरियानाच्या मातीतच असे वेगळेपण असावे असे त्यांनी म्हटले आहे. सन 2014 सालीही हरियानातच जन्मलेल्या एका इसमाने त्यांना वाराणसीत आव्हान दिले होते असा संदर्भ देत केजरीवालांनी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. सन 2014 साली स्वता केजरीवालांनी मोदींच्या विरोधात वाराणसीत निवडणूक लढवली होती. तेही मुळचे हरियानाचेच आहेत.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना चांगल्या दर्जाचे जेवणही नीट मिळत नाही अशी तक्रार या दलाचे जवान यादव यांनी सोशल मिडीयावर केल्यानंतर त्यांना 2017 मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनाच सपा-बसपा आणि राष्ट्रीय लोकदल आघाडीने मोदींच्या विरोधात वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या निवडणुकीला केजरीवाल यांनी साऱ्या देशाच्यावतीने शुभेच्छा दिल्या आहेत. वाराणसीत येत्या 19 मे रोजी निवडणूक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.