Gujrat Vidhansabha Elections – आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. भाजप एवढा घाबरला आहे की, त्या पक्षाने आता गुजरातच्या प्रत्येक जिल्ह्यात एका केंद्रीय मंत्र्याची ड्युटी लावली आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये केजरीवाल म्हणाले की, भाजपने गुजरातच्या प्रत्येक जिल्ह्यात एका केंद्रीय मंत्र्यांची किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्याची ड्युटी लावली असल्याची माहिती मिळाली आहे. बाप रे एवढी भीती? मात्र ही भीती आम आदमी पक्षाची नसून गुजरातच्या जनतेची आहे. राज्यातील जनता भाजपवर नाराज आहे व वेगाने आम आदमी पक्षाचा हात पकडते आहे.
Kejriwal on Saxena : केजरीवालांचा नायब राज्यपालांवर निशाणा; म्हणाले, माझी पत्नीही मला…
दरम्यान, दिल्लीतील भाजपचे नेते प्रवेश वर्मा यांनीही ट्विट करत केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री दिल्लीच्या दारू मंत्र्यांसोबत (मनीष सिसोदिया) गुजरातच्या गल्लीबोळातील लोकांच्या पाया पडताहेत असे ऐकायला मिळते आहे. Gujrat Vidhansabha Elections
भ्रष्टाचारी केजरीवाल आणि सिसोदियांनी तर अनेक ठिकाणी नाक घासल्याचेही आम्हाला ऐकायला मिळाले. मात्र, गुजरातच्या जनतेला तरीही आप म्हणजे पाप असल्याचेच वाटते आहे.
Congress । कॉंग्रेस पक्षाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे राष्ट्रपतींबद्दल अपशब्द