नवी दिल्ली – भारतात कोविड लसीच्या वापराला दिलेल्या अनुमतीनंतर राजकारण सुरू झाले असतानाच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मात्र या लसीच्या संशोधनाबद्दल देशातील वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
या संशोधन कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांना देश सलाम करीत आहे असे केजरीवालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या लसीचे उत्पादन करून वैज्ञानिकांनी आणि डॉक्टरांनी भारताच्या करोना विरूद्धच्या लढाईला विधायक दिशा दिली आहे असे केजरीवालांनी म्हटले आहे.
आजच या दोन्ही लसीच्या तातडीच्या वापराला औषध नियंत्रक महासंचलनालयाने अनुमती दिली आहे. त्यामुळे करोना विरूद्धच्या लढाईत मोठा टप्पा गाठला गेला आहे.