वॉशिंग्टन – अमेरिकेतील मेरिलॅन्ड प्रांताच्या नायब गव्हर्नरपदी भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांची निवड झाली आहे. मेरिलॅन्डच्या नायब गव्हर्नरपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय वंशाच्या राजकीय नेत्या ठरल्या आहेत.
अरुणा मिलर या मेरिलॅन्डच्या विधीमंडळातील माजी सदस्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या मिलर या मेरिलॅन्डच्या 14 व्या नायब गव्हर्नर ठरल्या आहेत. नायब गव्हर्नर हे पद गव्हर्नरांच्या पाठोपाठ प्रांतातील सर्वोच्च पद मानले जाते. गर्व्हनरांच्या अनुपस्थितीत किंवा अक्षमतेच्या काळात प्रांतासाठीचे महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार नायब गव्हर्नरांना असतो.
अरुणा मिलर या मूळच्या आंध्रप्रदेशातील आहेत. त्या 7 वर्षांच्या असताना 1965 साली त्यांचे पालक अमेरिकेत स्थायिक झाले होते. लहान असताना अमेरिकेत आल्यावर केवळ स्वतःपुरता विचार आपण केला. मात्र स्थलांतरितांची संख्या वाढत असताना केवळ स्वतःपुरता विचार करू शकणार नाही, असे अरुणा मिलर यांनी आपल्या पहिल्या भाषणात सांगितले.
New Zealand : पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचा तडकाफडकी राजीनामा
मेरिलॅन्डमध्ये आतापर्यंत अश्वेत व्यक्ती नायब गव्हर्नर बनली नव्हती. त्यामुळे आता वर्णभेदापासून दूर होण्याची प्रक्रिया मेरिलॅन्डमध्ये प्रभावी बनल्याचे बोलले जाते आहे.