पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या पक्ष प्रवेशाने राजकीय वातावरण बदलणार असल्याचे संकेत देत आहे.
गुरुवारी (दि.23) मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत महासंघाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे आदी उपस्थित होते.