मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे बुधवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
गेली पाच दशकाहून अधिक काळ काकडे यांनी रंगभूमीची सेवा केली. रंगायन, अविष्कार, छबिलदास आदीं चळवळीशी ते संबंधित होते. त्यांना महिंद्रा एक्सलन्स जीवनगौरव पुरस्कारांत दोन वर्षांपूर्वी सन्मानित करण्यात आले.
विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, माधव वाटवे यांच्यासह त्यांनी रंगभूमीची सेवा केली. प्रयोगशील ही ओळख त्यांनी आयुष्यभर जपली.