नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे उपचाराकरीता दिल्लीतील एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जेटली यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना ९ ऑगस्ट रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेल्याने आज १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS. pic.twitter.com/pmr4xiyqYV
— ANI (@ANI) August 24, 2019
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता.