अरुण जेटली अनंतात विलीन, मुलगा रोहनकडून मूखाग्नी

नवी दिल्ली  – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अनंतात विलीन झाले. रविवारी दुपारी 1 वाजता अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला भाजपा मुख्यालयातून सुरूवात झाली. निगमबोध घाटावर तीन वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी सर्व संस्कार पार पडल्यानंतर त्यांचा मुलगा रोहन जेटली यांनी अरुण जेटली यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. भाजपा मुख्यालयात अरुण जेटली यांचं भाजपा आणि इतर राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

शनिवारी दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी जेटली यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा होत होते. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अरुण जेटली यांच्यावर रविवारी दुपारी निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा, कॉंग्रेस आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×