कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ ‘क्‍लबचर’

कलेच्या क्षेत्रात करिअर म्हणजे एक वेगळाच संघर्षच. कधी काम मिळते. तर कधी त्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. नाटक आणि पुणे हे जरी समीकरण असले तरी देखील पुण्यातील प्रायोगिक नाट्य कलाकारांनी अपेक्षित प्रेक्षक वर्ग मिळत नाहीत, अशी भावना अनेक जण व्यक्त करतात. त्यात संघर्ष करणाऱ्या नवोदित कलाकारांना गरज असते, ती एका “प्लॅटफॉर्म’ची.

पुण्याच्या संकेत अनगरकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सर्वच क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने “क्‍लबचर’ची सुरूवात केली आहे. विविध कलाकारांना एकाच छताखाली आणण्याचे काम “क्‍लबचर’ करत आहे. सध्या क्‍लबचर व्हॉटस्‌ ऍप, फेसबुक, इन्टाग्राम, युट्युब आदी सोशल मीडियावर तरुणाईमध्ये “हिट’ झाले आहे. मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी असणाऱ्या संकेतने सोशल मीडियाच्या माध्यमातून “क्‍लबचर’ची निर्मिती केली. यामध्ये लेखक, गीतकार, गायक, वादक, छात्राचित्रकारांसह अभिनय, गायन, नृत्य, नाट्य, चित्रपट आदी प्रांतातील कलाकारांचा समावेशआहे. अभिनेत्या कलाकारांना एकत्र घेऊन “क्‍लबचर’ने नुकतीच एक “बाप्पा मोरया’ ही “शॉर्टफिल्म’ तयार केली. तर 18 सप्टेंबरला सिम्बायोसिस आणि उद्‌गार करंडक विजेत्या एकांकिकांच्या अभिवाचनाचा “वाचनोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे.

नव्याने कला क्षेत्रात येणाऱ्यांना या ग्रुपच्या माध्यमातून अनेकांना “कनेक्‍ट’ होता येणार आहे. कलाकारांना मिळणाऱ्या मार्गदर्शन आणि कल्पनांमुळे “अनोख्या’ गोष्टींची निर्मिती होऊ शकते. यासह कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. “क्‍लबचर’च्या निर्मितीमध्ये आर्थिक कमाईचा नव्हे तर कलाकारांनी व्यासपीठ मिळण्याचा हेतू असल्याचे “क्‍लबचर’चा संस्थापक संकेत अनगरकर सांगतो.

– कल्याणी फडके

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)