मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ६५ वर्षांवरील कलाकारांना चित्रीकरणात सहभाग घेण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने हे निर्बंध हटवून जेष्ठ कलाकारांना चित्रीकरणात सहभागी होण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता यापुढे ६५ वर्षांवरील कलाकार शूटिंगमध्ये सहभागी होऊ शकतील. मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे ठाकरे सरकारला चपराक दिलेली आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून जेष्ठ कलाकारांना शूटिंगमध्ये सहभागी होऊ देण्याची मागणी होत होती परंतु ठाकरे सरकारने याबाबत परवानगी नाकारल्याने नाराजीचे सूर उमटले होते.
Bombay High Court allows all persons above 65 years of age working in the entertainment industry to work on a film set. The court sets aside the state government order.
— ANI (@ANI) August 7, 2020
याबाबत प्रोड्युसर फेडरेशन च्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर ठाकरे सरकारने ६५ वर्षांवरील कलाकारांवर लावलेले निर्बंध रद्द करून त्यांना परवानगी दिलेली आहे.
या नवीन गाईडलाईन नुसार आता यापुढे चित्रीकरणाचे काम सुरु राहणार असून कलाकारांसह सेटवरील सर्वांनीच सर्व खबरदारी घेणे बंधनकारक असणार आहे