पूना कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड कॉमर्स : सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन
पुणे : जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, वक्तृत्व स्पर्धा, शास्त्रीय नृत्य – कथकली, भरतनाट्यम अशा विविध स्पर्धांमधून महाविद्यालयीन तरुणाईने आपला कलाविष्कार सादर केला. पूना कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड कॉमर्सच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा आणि युवक संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता संघटना, पूना कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते विभागीय स्तरावर पुणे जिल्हयाचे नेतृत्व करणार आहेत.
युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी परिक्षक सोनल नागपुरे, पूना कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड कॉमर्सचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते ताहीर आसी, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, प्रदीप पवार, अंजली पवार व उपप्राचार्या इक्बाल शेख, आगा इम्तियाज यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन क्रीडाशिक्षक शेख असद, इम्रान पठाण, जुबेर पटेल, वसुधा वाव्हळ, डॉ. गुलाब पठाण, डॉ. बाबासाहेब शेख यांनी केले.
निकाल –
१) लोकनृत्य – पूना कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स – भांगडा (प्रथम) – दस्तूर हायस्कूल – राजस्थानी गरबा (द्वितीय), मोलेदीना हायस्कूल – कोळी नृत्य (तृतीय) –
२) भरतनाट्यम – कडाळे विकीराज -ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रथम), मानसी इनामदार, स.प. महाविद्यालय (द्वितीय),साहिल कडू -पूना कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स (तृतीय)
३) कथक – त्रिशा पथक – पूना कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स (प्रथम), विनायक लोंढे – वाय. सी. एम.(द्वितीय), अक्षता वाव्हळ – व्ही. आय. टी.(तृतीय),
४) शास्त्रीय गायन – संतोष भोसले, (प्रथम), विवेक टि.ए. (ए.पी.एस) (द्वितीय), गौरव भागवत-पूना कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स (तृतीय)
५) गिटार वादन – वर्षा बेंडगुळे – कॅम्प एज्युकेशन (प्रथम), सलोनी जगदाळे – पूना कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स (द्वितीय), इक्रा हुसैन – पूना कॉलेज आॅफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स (तृतीय),
६) एकांकिका स्पर्धा – आवेज शेख – पूना कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स (प्रथम), समद आसी – हसन हुसेन ज्युनियर कॉलेज (द्वितीय), विशाल गिरबाजे – पूना कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स (तृतीय) ७)वक्तृत्व स्पर्धा – जुबिया राहिन – पूना कॉलेज आॅफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स (प्रथम), सोमनाथ बांगर – कॅम्प एज्युकेशन – (द्वितीय), भरत चौधरी – कॅम्प एज्युकेशन (तृतीय)