खडूशिल्पांत रमणारा कलावंत

नगर: गणपती हे अनेक भाविकांचे आराध्य दैवत आहे, मात्र जगात अशीही काही माणसं आहेत की जी मुळात फार श्रद्धाऴू नाहीत पण गणपती हे त्यांचे आवडते दैवत आहे. अशाच एका व्यक्तीची गाठ पडली त्यांच नाव अशोक डोऴसे. पेशानं कला शिक्षक दर गणपतीला घरचा गणपती स्वतः तयार करणार एव्हढंच नव्हेतर इकोफ्रेंडली बनविण्याच्या कार्यशाळेत गणपती बनवायला शिकवतांना त्यात रममाण होणारे. त्यांना विचारलं तुम्हाला कोणत्या माध्यमात गणपती बनवायला आवडेल त्यांनी तत्काळ उत्तर दिलं खडुचा गणपती करायला आवडेल आणि गणेशोत्सवाच्या निमित्तने त्यांच्या कडे गेलो तर खरच त्यांनी खडुत 7ते आठ गणपती कोरून ठेवलेले पहायला मिळाले.

डोळसेंकडे पुठ्ठा, शाडू, पेपर क्विलींग, सिपोरेक्‍स, लाकुड, कापडी, किचनवेअर पासून तयार केलेले गणपती पहायला मिळतात. पुन्हा एकदा दैवताचा प्रश्‍न निघालाचतेव्हा ते म्हणाले मी फार श्रद्धाळू नाही पण कलाकारांचं आराध्यदैवत गणपतीच असावा असंमला वाटतं. गणपतीच्या निरनिराळ्या आकारातून मला प्रेरणा मिळते, गणपती मग तो क्रिकेट खेळतांना काढा की वैज्ञानिक म्हणून दाखवा तो सगळ्यात फिट्ट बसणारं दैवत बर त्याच्या या रुपांना कोणी आक्षेपही घेतनाही. त्याची सोंड उजवी की डावी मला काही फरक पडत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वी मी कॅलेंडरसाठी गणपतीची चित्र काढायचो. वेरूळ मधल्या लेण्यातील गणपतीचे रुप मला खूप आवडायचे फारसे कोरीव काम नसले तरीही ते खूप लोभसवाणे वाटतात. माझ्या लहानपणी मी तेलिखुंट पॉवर हाऊस पाशी रहायचो तेथे बैलपोळ्यानिमित्त मातीच्या बैलांचा बाजार भरायचा तुटलेले बैल लोक आमच्या मागच्या दारात टाकून जायचे आम्ही ते आणायचो भिजवायचो आणि त्यापासून निरनिराळ्या मूर्ती करायला शिकलो. तेव्हा त्यामातीत खेळलो म्हणून आज इथपर्यंत येवून पोहोचलो.

पेपर, शाडू आणि अन्य गणपतींबरोबर खडू शिल्पातले गणपती पहाताना त्यातही ग्रामदैवत अष्टविनायकाची खडुशिल्प पाहाताना मन गणपतीच्या गप्पांत हरवून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)