मधुमेहींसाठी कृत्रिम गोडीचे पदार्थ 

 डॉ. गौरी दामले, मधुमेहतज्ज्ञ 
 डायबेटीसच्या सर्व रुग्णांना पथ्य पाळावे लागते हे आपल्याला माहीत आहे आणि या पथ्याचा मुख्य भाग म्हणजे साखर आणि गोड पदार्थ खाण्यावर येणारे बंधन. हे बंधन सुसह्य व्हावे व मधुमेहींनासुद्धा गोडी चाखता यावी म्हणून विविध कृत्रिम स्वीटनर्सचा शोध लागला आहे, तसेच साखरेची पातळी न वाढवता गोडवा निर्माण करणारे नैसर्गिक घटकही उपलब्ध आहेत. ही मधुमेहींना चालू शकणारी कृत्रिम साखर नॉनकॅलरिक नॉन-न्युट्रिटिव्ह (अगदी कमी उष्मांक व पोषणमूल्य) अशी असते. आपला भारतीयांचा दैनंदिन आहार हा जास्त पिष्टमय पदार्थ, तुलनेनी कमी प्रथिने व जास्त स्निग्ध पदार्थांचा असतो. अशा आहारात साखरेची भर पडणं हे नक्कीच योग्य नसते. त्याचमुळे साखर टाळून कृत्रिम गोड पदार्थ वापरणे काही वेळेस संयुक्तिक ठरते. साखरेची पातळी वाढू न देणे (कॅलरीज कमी) वजन उतरवण्यास मदत होणे अशा कारणांमुळे नॉर्मल व्यक्तीही काही वेळेस अीींळषळलळरश्र ीुशशींशपशीी वापरतात. तर सध्या बाजारात उपलब्ध असलेली कृत्रिम स्वीटनर्स आपण पाहू या.
शुक्रालोज- साखरेपेक्षा 600 पट गोड असलेले हे संयुग पोटात गेल्यावर पचत नाही, तसेच शोषलेही जात नाही. 1969 साली बाजारात उपलब्ध झालेले शुक्रालोज जास्तीत जास्त 15 मिलीग्रॅम/किलोग्रॅम वजन या प्रमाणात वापरू शकतो पावडर किंवा गोळ्या स्वरूपात सहज उपलब्ध आहे.
ऍस्पारटेम- 1981 पासून उपलब्ध असलेले हे रसायन साखरेपेक्षा 200 पट गोड असलेला हा पदार्थ पावडर, गोळ्या, थेंब असा उपलब्ध असून 40 मिग्रॅ./किग्रॅ. वजन यापेक्षा कमी डोसमध्ये रोज वापरता येतो. ऍस्पारटेम पोटात शोषले जाऊन पचवले जाते.
सॅकरिन- शरीरात खूप जलद शोषले जाणारे हे केमिकल खरे तर 1958 मध्येच शोधले गेले, पण साईट इफेक्‍ट्‌सच्या भीतीने मागे पडलेले हे केमिकल 2000 सालात परत उजेडात आले. दिवसाला 5 मिग्रॅ./किग्रॅ. वजनापर्यंत थेंब, गोळ्या, पावडर अशा स्वरूपात ते वापरले जाऊ शकते. हे साखरेहून 300 पट गोड आहे.
ऍसेसल्फेम- शरीरात न शोषले जाणारे व न पचणारे हे संयुग साखरेपेक्षा 200 पट गोड आहे. 1998 साली शोधलेली ही कृत्रिम साखर 15 मिग्रॅ/किग्रॅ वजनापेक्षा कमी प्रमाणात वापरली जाऊ शकते.
स्टिव्हिया- ही वनस्पती साखरेपेक्षा 300 पट गोड असून शरीरात पचली जाते. 2008 साली या वनस्पतीचा शोध लागला. 4 मिग्रॅ/किग्रॅम वजनाचे आत याचा डोस वापरता येतो. पाने, अर्क, पावडर, गोळ्या, थेंब या सर्व स्वरूपात हे उपलब्ध आहे व नैसर्गिक असल्याने लोकप्रियही आहे.
काही महत्त्वाचे मुद्दे
 कृत्रिम साखर वापरल्याने अन्नाची चव व भूक दोन्ही वाढते. जेवण आपसूक वाढते व वजन वाढीला निमंत्रण मिळते. वजन उतरण्याऐवजी वाढू शकते.
 सॅकरिन या घटकामुळे उंदरांवरील प्रयोगात कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आढळले आहे.
 या कृत्रिम साखरेमुळे शरीरातील चरबी साठून राहण्यासही चालना मिळते व वजनवाढ होते.
 सॅकरिन हे ढहशीारश्रश्रू ीींरलश्रश नसल्याने गरम पदार्थात वापरल्यास कडवट चव येते.
 ऍस्पारटेमयुक्त पदार्थ पुन्हा गरम केल्यास हायड्रॉलिसिस (कूवीेश्रूीळी) ही क्रिया होऊन मिथाईल अल्कोहोल या विषारी पदार्थाची निर्मिती होते. तसेच या हायड्रॉलिसिसमुळे निर्माण होणारे ऍस्पारटेट व ग्लुटामेट हे पदार्थ मेंदूला उत्तेजित करतात.
ऍस्पारटेममुळे कामकाजातील बारकावे आणि सुसूत्रता कमी होते (लेसपळींर्ळींश वूीर्षीपलींळेप)
 शुक्रालोज हे गरम केल्यावरही अविघटीत राहाते (ढहशीारश्रश्रू ीींरलश्रश) व त्यामुळे सुरक्षित समजले जाते व त्याला कडवट चवही येत नाही.
 तथाकथित सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शुक्रालोजसह सर्व आर्टिफिशियल स्वीटनर्सचा आतड्यातील नैसर्गिक जीवाणूंवर विपरित परिणाम होतो व शरीरातील साखरेचे संतुलन बिघडून नव्याने टाईप-2 डायबेटीस होण्याचा धोका असतो.
 कृत्रिम साखरेच्या सेवनाचे व्यसन लागू शकते.
 लहान मुले व गर्भारपणात यापैकी कोणत्याच केमिकलवर पुरेशा चाचण्या झालेल्या नाहीत; परंतु कित्येक सॉफ्ट ड्रिंक, मुलांचा खाऊ, टॉनिक यात कृत्रिम स्वीटनर्स आढळतात. यापैकी शुक्रालोज हा त्यातल्या त्यात सुरक्षित आहे.
 “शुगरफ्री’ म्हणून बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये, आईस्क्रीममध्ये माल्टोडेक्‍सट्रिन हा पदार्थ असतो जो शरीरात साखरेमध्येच रूपांतरित होतो तेव्हा सावध राहा.
सर्व नैसर्गिक गोष्टी सुरक्षितच असतात असे नाही. चहा, कॉफी, अफू, मिरच्या व मसालेदार पदार्थ अशा अनेक गोष्टी नैसर्गिक असूनही त्रासदायक ठरू शकतात. त्याचमुळे स्टिव्हियासारख्या नैसर्गिक स्वीटनर वापरतानाही काळजी घ्या. अतिरेक टाळा. तेव्हा कृत्रिम स्वीटनर्स ही वाटतात तेवढी चांगली व सुरक्षित नाहीत याची नोंद ठेवा. मुलांना व प्रेग्नंट स्त्रियांमध्ये वापरताना विशेष काळजी घ्या. शेवटी जिबेवर, खाण्यावर नियंत्रण ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय!
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)