नोवेल करोना विषाणूंचे कृत्रिम संवर्धन

औषध चाचणी आणि लस विकसित करण्यास ठरणार फायदेशीर

नवी दिल्ली: नोवेल करोना विषाणू हा एक नवीन विषाणू आहे आणि संशोधक त्यातील सर्व भिन्न बाबी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पेशीकामय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राने (सीसीएमबी) रूग्णांच्या नमुन्यांमधून करोना विषाणूचे स्थिर संवर्धन केले आहे. सीसीएमबीमधील विषाणूशास्त्रज्ञांनी कित्येक पृथक्करणातून संक्रामक विषाणू वेगळे केले आहेत. प्रयोगशाळेत विषाणूचे संवर्धन करण्याची क्षमता ही सीसीएमबीला लस विकासासाठी आणि कोविड -19शी लढण्यासाठी संभाव्य औषधांच्या चाचणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सीसीएमबीचे प्रधान वैज्ञानिक डॉ. कृष्णन एच हर्षन म्हणाले, नोवेल कोरोना विषाणू हा पेशींच्या चेतातंतूंच्यामार्फत मानवी पेशीमध्ये प्रवेश करतो. ज्यामुळे संक्रमित रुग्णाला श्वसनाचा त्रास होतो. तथापि, आपण प्रयोगशाळेत मानवी एपीथेलीअल पेशी वाढवू शकत नाही.

सध्या, मानवी उत्क्रांतीतून निर्माण झालेल्या प्राथमिक एपिथेलियल पेशी बऱ्याच पिढ्यांपासून प्रयोगशाळेत संवर्धित केल्या जात नाहीत, ज्या विषाणूच्या सततच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण आहेत. त्याच वेळी, विषाणू संवर्धन करीत असलेल्या प्रयोगशाळांना “जिवंत’ पेशींची आवश्‍यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

ऍन्टीबॉडी प्रतिसादाच्या कार्यक्षमतेसाठी अशा प्रकारच्या प्राण्यांवर सध्या चाचणी सुरू आहे. मानव सोडून इतर प्राण्यांमध्ये तयार केलेली प्रतिपिंडे शुद्ध केली जाऊ शकतात, त्यांच्यावर प्रक्रिया करून संग्रहित पण केली जाऊ शकतात. संसर्गग्रस्त रूग्णांसाठी अँटीबॉडीजचा उपचारात्मक हस्तक्षेप म्हणून वापर केला जाऊ शकतो. अशा अँटीबॉडीज मनुष्यात लसीद्वारे दिल्यास विषाणू विरोधात प्रतिसाद देतात आणि संसर्ग मर्यादित ठेवण्याची क्षमता त्यांच्यात असू शकते.

अँटीबॉडीज शरीरात सोडल्यामुळे लसीप्रमाणे प्रतिकारशक्ती मिळत नाही, परंतु विषाणूविरूद्ध अँटी डॉट्‌स म्हणून ते मानले जाऊ शकते. हे विषाणू संवर्धन औषध चाचणी प्रक्रियेत देखील उपयुक्त ठरू शकते. संभाव्य औषधांच्या कार्यक्षमतेसाठी परीक्षानळीत विषाणूविरूद्ध चाचणी केली जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.