#WorldPhotographyDay : 186 वर्षांचा थक्क करणारा प्रवास

जागतिक छायाचित्रण दिन : व्यावसायिक कक्षा रुंदावलेली तंत्रकला ‘फोटोग्राफी’

-देविप्रसाद अय्यंगार

जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवऴ छोट्याशा आकारात छापलेलं छायाचित्रातून सांगता येत. फोटोग्राफी ही आजच्या आधुनिक जगाची जागतिक परिभाषा (युनीव्हर्सल लॅग्वेज) बनली आहे.या तंत्रकलेनं अवघं विश्‍वच नव्हे तर अवकाशही(पाताळासह) व्यापून टाकलं आहे.

आताच्या युगात प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये कॅमेराची सोय आहे, किंबहुना मोबाईल हॅंडसेट घेतांना कॅमेरा किती मेगापिक्‍सलचा आहे ते आवर्जून पाहिलं जात, किंवा मोबाईल कंपन्या देखील मोबाईल मधील कॅमेऱ्याचीच जाहिरात करत असतात. त्यामुळे आज प्रत्येकजण आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांचे छायाचित्रीकरण करत असतो. हिच या तंत्रकलेची उजवी बाजू आहे.

1835 साली जेव्हा या तंत्रकलेला मान्यता मिळाली त्यानंतर झपाट्याने ही तंत्रकला जगभर पसरली. सुरुवातीला पिनहोल कॅमेरे, त्यानंतर फिल्मचे मोठे कॅमेरे, सुरुवातीच्या जमान्यातील कृष्णधवल, त्यानंतरच्या काळातील रंगीत आणि आताच्या जमान्यातील डिजीटल कॅमेरा, अशी वाटचाल करायला या तंत्रकलेला केवळ 186 वर्ष लागली. या तंत्रकलेत आलेली स्थित्यंतरे पाहता अन्य कोणत्याही क्षेत्रात एव्हढी झपाट्याने बदल घडले नाहीत, असा हा बदलत्या स्थित्यंतराचा प्रवास थक्क करणाराच आहे.

या स्थित्यंतरानं अवघ्या जगातील फोटोग्राफीची समीकरणे बदलून टाकली अर्थात मुळ तंत्र मात्र तेच राहिलं हे स्थित्यंतर होतं डिजीटल फोटोग्राफीचं आजच्या डिजीटल युगात आता फोटोग्राफीनं अवघं विश्‍वच व्यापून टाकल आहे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे आता फिल्मच्या कॅमेऱ्यांची जागा डिजीटल कॅमेऱ्यांनी घेतली आहे. त्यातही काही दशकांपूर्वी पुढचं पाऊल म्हणून मिरर लेन्स कॅमेऱ्यांचे अस्तित्व बाजारात दिसू लागले.

फोटोग्राफी तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने जगभर झालेला असला तरी फोटोग्राफीचा तंकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था मात्र मोजक्‍याच आहेत. वास्तविक पाहता एक चांगल्या दर्जाचा व्यवसाय म्हणून फोटोग्राफीकडे पाहिले जाते. त्यामुळे या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी या तंत्रकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे ठरते.

जस जशी फोटोग्राफीची व्याप्ती वाढत गेली तसंतशी त्याच्या व्यावसायिक कक्षाही रुंदावल्या. आज गरजेनुसार शेकडो विषयांचे छायाचित्रण व्यावसायिक म्हणून करता येते. त्यात व्यक्‍तीचित्रण, समारंभाचे छायाचित्रण (फक्‍शनल), औद्योगिक (इंडस्ट्रियल), व्यक्‍तीचित्रण (पोऱ्ट्रेचर), निसर्गचित्रण (नेचर), फॅशन, वन्यजिवांची छायाचित्रे (वाइल्ड लाइफ), स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्‍चरल), क्रीडा (स्पोर्टस्‌), सुक्ष्म वस्तुंचे छायाचित्रण (मायक्रो), अवकाशातून टिपलेली छायाचित्रे (एरियल), जाहिरातींसाठी छायाचित्र काढणे (ऍव्हर्टायझिंग फोटोग्राफी), वर्तमानपत्रांसाठी छायाचित्रण (फोटो जर्नालिझम), समुद्र तळातील छायाचित्रण (अंडरवॉटर फोटोग्राफी), पर्यटन (ट्रॅव्हल) या व्यतिरिक्‍त पिक्‍चोरियल (वास्तवदर्शन) घडवणारी फोटोग्राफी अशा अनेक विषयांची जंत्री देता येईल. मात्र या सगळ्या विषयांचे छायाचित्रण करण्याचे तंत्र आणि मंत्र आत्मसात करण्याची आवश्‍यकता असते. शिवाय स्वत:तील नवनिर्मितीच्या गुणांना (क्रिटीव्हीटीला) वाव देण्याची गरज असते. कालमानपरत्वे वरील सर्व विषयांच्या संकल्पनाही बदलत आहेत.

आंतरराष्ट्रीय परिभाषा ठरलेल्या फोटोग्राफी या क्षेत्रात उत्तमोत्तम संधी तर आहेतच मात्र या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी गरज असते ती नवनवे बदल स्विकारण्याची. तसेच शास्त्रोक्‍त प्रशिक्षण, जिद्द आणि चिकाटीची, कष्ट करण्याची तयारी असेल तर या तंत्रकलेवर उपजिविका करणे सहज शक्‍य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.