असा जाणार उर्वरित जुलै महिना.. वाचा सर्व १२ राशींचे भविष्य

पुणे – जुलै महिना ज्येष्ठ आणि आषाढ या मराठी महिन्यात विभागला गेला आहे. महिन्यात आषाढी एकादशी ,गुरुपौर्णिमा अशा दोन महत्त्वपुर्ण तिथी या महिन्यात असुन या  महिन्याच्या मध्या पर्यंत रवी मिथुनेत आणि महिन्याच्या मध्या नंतर कर्क राशीत रवीचे भ्रमण राहणार आहे.
मंगळ तब्बल एक मास कर्क राशीत आहे. बुध सुद्धा अनुक्रमे मंगळा सोबत कार्केतच असणार आहे. गुरु वृश्चिकेत वास्तव्य करून आहे. शुक्र महिन्याच्या अखेरपर्यंत मिथुनेत असणार असुन शनी चे वास्तव्य धनु राशीत असणार आहे.

मेष
या राशीच्या व्यक्तींना राजकारणात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रातही मोठा फायदा होईल. नोकरीमध्ये चांगला मार्ग मिळेल. मात्र अडचणी येतील त्यावर मात करत प्रगती हळूहळू होत राहील. मानसिक तणाव असेल. पत्नीची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून अचानक भल्याच्या गोष्टी घडतील.

उपाय– सूर्याला अर्घ्य व कबूतरांना दाणे टाकावे. मोठ्यांची गोष्ट ऐकावी. रागावर नियंत्रण असू द्या.
बाधा निवारणासाठी- ‘ॐ गं गणपतये नम:’ व लक्ष्मी साठी ‘ॐ श्री महालक्ष्म्यै नम:’ या मंत्राची 1-1 माळ जपावी.

वृषभ
ह्या राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र स्वरुपाचा असणार आहे.  घरात गुडन्यूज मिऴेल. कृषी क्षेत्रातही लाभ मिळेल. व्यापारात मात्र परिस्थिती ठिकठाक राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मानसिक तणाव मात्र या महिन्यात आपल्याला असणार आहे.
उपाय- पिंपळाच्या झाडाला जल चढवावे आणि तेलाचा दिवा लावावा. वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्यावा. स्वार्थ सोडून द्यावा
बाधा निवारणासाठी– ‘वक्रतुण्‍डाय हुं’ व धनासाठी ‘ॐ श्री नम:’ मंत्राची 1-1 माळ जपावी.

मिथुन

या राशीच्या व्यक्तींना हा महिना चतुराईनं घालवावा लागणार आहे. आपल्या कार्यसिद्धीमध्ये आपण यशस्वी व्हाल. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं योग्य आहे तो तुमच्यावर हावी झाला तर मोठं नुकसान होऊ शकतं. रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे.

षष्टात गुरु आणि सप्तमात शनी आणि केतु चे भ्रमण राहणार असुन एकंदरीत महिना हा सर्वसमावेशक राहील काही बाबी मना सारख्या तर काही मनाविरुद्ध घडतील महत्त्वाचे निर्णय याच कळत मार्गी लावले तर उत्तम राहील.
उपाय- महादेवाला जल, पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करावे, व तेलाचा दिवा लावावा.
बाधा निवारणासाठी- ‘ॐ गं गणपतये नम:’ जपावे.

कर्क
या महिन्यात मंगळ बुध यांची युती राशीत होत असुन पंचमात गुरु चे भ्रमण आणि षष्टात शनी आणि केतु यांची युती होत आहे.आणि व्येय स्थानात अनुकुलातेची बीज या महिन्यात मिळणार असुन मिळालेल्या संधीचा उत्तम लाभ घेतल्यास यश तुमचेच आहे. या राशीच्या व्यक्तींना प्रवासाचा योग आहे. या महिन्यात आपलं भरपूर मनोरंजन होणार आहे. आत्मचिंतन करण्याची संधी मिळाली आहे. कुटुंबातील परिस्थिती बेताची राहिल.
उपाय- गाय, कुत्रा, मुंग्यांना खाऊ घाला. गरिबांची मदत करा.
धन प्राप्तीसाठी- ‘ॐ वित्तेश्वराय नम: या मंत्राची 1 माळ जपावी.

सिंह
पंचमात शनी आणि केतु यांची युती होत आहे. लाभात शुक्र आणि राहु यांचे भ्रमण होत असुन व्येय स्थानात मंगळ आणि बुध यांचे वास्तव्य आहे. एकंदरीत महीना काहीसा तणाव पूर्वक राहणार असुन सर्व बाबींकडे यथा योग्य लक्ष दिले असता हा महीना निभावुन जाता येईल.

हा महिना कोर्ट कचेरीच्या कामात जाईल. व्यवसायात चांगली प्रगती होणार. कृषी क्षेत्रात सामान्य परिस्थिती असेल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक, मानसिक, कुटुंबीय आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल.
उपाय– सूर्याला अर्घ्य द्या व पिंपळाच्या झाडाला शर्करायुक्त पाणी अर्पण करा. मुंग्यांना व पक्ष्यांना दाणा टाकावा. विद्यार्थ्यांना मदत करा. – ‘ॐ ह्रीं सूर्याय नम:’ मंत्र जपावे.

कन्या
रविचे भ्रमण दशम आणि लाभ स्थानातून होत असुन तृतीयात गुरुचे भ्रमण होत आहे.चतुर्थात केतु आणि शनी यांचे वास्तव्य आहे.शुक्र आणि राहु दशमात ठाण मांडुन बसलेले आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना खूप अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच नियोजन करा. व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कृषी क्षेत्रात सामन्य स्वरुप राहिल. नोकरीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींसोबत नवीन कार्य, व्यवहार करणं टाळा.
उपाय– तुळस व केळीच्या झाडाला जल अर्पण करावे. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शिव महिम्न स्तोत्राचा पाठ करावा व देवी कवच वाचावे.
बाधा निवारणासाठी– कुत्र्याला पोळी खाऊ घालावी आणि अशक्त लोकांची मदत करावी.
व्यापार वृद्धीसाठी- ‘ॐ ह्रीं नम:’ जपावे.

तुळ
.बुध आणि मंगळ यांची युती दशमात होत असुन एकंदरीत ग्रहमान पाहता महिन्याची सुरवात थोडी कठीण नक्कीच आहे पण महिन्याच्या मध्या नंतर किंवा अखेरीस तुमच्या साठी अनुकुल काळ राहील. हा महिना आर्थिक प्रगती करणार असणार आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल. कृषी क्षेत्रात चढ-उतार येतील.

नोकरी आणि अधिकार या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. संयम राखणं महत्त्वाचं आहे. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील.सासरहून मदत मिळेल. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

उपाय- पक्ष्यांना दाणा टाकावा. मोठ्यांची सेवा करावी.
आकर्षण प्राप्तीसाठी– ‘ॐ ह्रीं नम:’ जपावे

वृश्चिक
नवमात बुध आणि मंगळ यांचे यांची युती होत आहे.हे सर्व भ्रमण पाहता ग्रहमान आपल्या प्रगतीसाठी सकारात्मक आणि पुरक आहे.आगामी काळासाठी काही योजना राबवता आल्या असता उत्तम राहील. जुलै महिना हा कौटुंबिक सुख देणारा असणार आहे.
कृषी क्षेत्रात स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आरोग्य सुधारेल. मित्रांसोबत भेटीगाठी होतील. मित्रांकडून संकटसमयी मदत मिळेल.
उपाय– पिंपळाच्या झाडावर जल चढवावे
प्रगतीसाठी- ‘ॐ हं हनुमते श्री रामचन्द्राय नम:’ मंत्राचा जप करावा. याने शांती मिळण्यास मदत होईल.

धनु

रवी चे भ्रमण सप्तमातून अष्टमात होत आहे.केतु आणि शनी चे वास्तव्य राशीतच असणार आहे.शुक्र आणि राहुचे भ्रमण सप्तम स्थानात होत आहे.मंगळ आणि बुध हे अष्टमात असुन व्येय स्थानी गुरुचे भ्रमण आहे. हा महिना पती-पत्नीचं नातं आणि त्यांची प्रगती करणारा असणार आहे.

व्यवसायात चढ-उतार येणार आहेत. कृषी क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. राजकारणात असलेल्यांना फायदा होईल.
उपाय– मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा व अशक्त विशेषतः वृद्ध लोकांची सेवा करावी
ज्ञान प्राप्तीसाठी- ‘ॐ गुं गुरोभ्यो नम:’ जपावे

मकर
हा महिना आपल्यासाठी आर्थिक लाभ मिळवून देणार आहे. व्यापार-कृषी क्षेत्रात फायदा मिळेल. नोकरीमध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
रविचे भ्रमण सप्तमातून षष्ट स्थानातून होत आहे.षष्टत राहु आणि शुक्राचे भ्रमण होत असुन सप्तमात बुध आणि मंगळ यांचे भ्रमण होत असुन लाभत गुरु तसेच व्येयात केतु आणि शनी यांचे वास्तव्य आहे.

एकंदरीत ग्रहमान पाहता एकंदरीत आयुष्याची घडी योग्य बसवावी लागेल सगळ्याच पातळींवर आपल्याला मेहनतीने काम कराव लागेल.
उपाय- वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्या. एखाद्या मजारवर प्रत्येक गुरुवारी गुलाबाचे अत्तर व फूल अर्पण करावे
शांतीसाठी– ‘ॐ शं शनैश्चराय नम:’ मंत्राचे जप करावे

कुंभ
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळणार आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे. पत्नीची साथ मिळेल आणि समस्येचा सामना करण्याचं बळ येईल. रविचे भ्रमण षष्टातुन पंचमात भ्रमण होत आहे.

शुक्र आणि राहु यांचे पंचमात वास्तव्य आहे.षष्टात बुध आणि मंगळ यांचे भ्रमण चालु आहे.दशमात केतु आणि लाभत केतु आणि शनी यांचे महिनाभर वास्तव्य आहे.महिन्याच्या सुरवातीचा काळ काहीसा खडतर असला तरी हरकत नाही कारण महिन्याच्या मध्या नंतर आर्थिक प्रगती होईल आणि पुढील काही काळ प्रगती अशीच सुरु राहील.

उपाय– सूर्याला अर्घ्य द्या. महादेवाला जल चढवावे. देव-दर्शन करावे.
बाधा निवारणासाठी– कुत्रा व गायीला पोळी खाऊ घाला. अशक्त व वृद्ध लोकांची मदत करा व ‘वक्रतुण्डाय हुं’ जपावे.

मीन
शनी व केतु दशमात वास्तव्य करून आहेत. महीना सुरु होताच थोडस तणावाचसोबत घेऊन येत असला तरी महिन्याच्या शेवटी यशदायी होण्यासाठी हि परिस्थिती निर्माण होत आहे.हा महिना आपल्यासाठी परिवर्तन करणारा असणार आहे.
नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये मध्यम स्वरुपाची स्थिती असेल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
उपाय– केळीच्या झाडाला जल अर्पण करावे . तुपाचा दिवा लावावा.
बाधा निवारणासाठी- मुंग्या आणि पक्ष्यांना दाणा टाकावा. सूर्याला जल अर्पण करावे, वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्यावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.