महेंद्र पंढरीनाथ पठारे…, म्हणजेच अनेक पैलू असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कुस्ती क्षेत्रात आयुष्य वेचणारे अनेक पहिलवान व मल्लाचे आश्रयदाते “शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित माननीय आण्णासाहेब ऊर्फ पंढरीनाथ तुकाराम पठारे यांचे ते चिरंजीव. मात्र, स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहिले जाते. त्यांच्या याच गुणस्वभावामुळे चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ते सर्वांना आपलेसे वाटतात. महेंद्र पंढरीनाथ पठारे म्हणजेच आमचे लाडके “आबा’ हे नाव आता लोकनेतृत्व म्हणून सुपरिचित झाले आहे, आपल्या “घरच्या माणसाचा’च वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले हे दोन शब्द…. – किरण नवनाथ खैरे, अध्यक्ष, “महेंद्रआबा पठारे युवा मंच’
आमच्या भागातील असंख्य तरुणांच्या पाठीवर हात ठेवून लढण्याची हिंमत देणारे लोकप्रिय नेतृत्व. “कर्म करत राहा’ हा त्यांच्या स्वभावगुण. समाजाप्रती आपण काहीना काही देणे लागतो. या भावनेतून राजकारणातून समाजकारण कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे आबा! तरुणांनी राजकारणात यावे आणि समाजाप्रती आपले योगदान द्यावे, या त्यांच्या विचारांमुळे माझ्या सारख्या तरुणाला वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक समाजोपयोगी कामात सावलीप्रमाणे आबांची साथ लाभली व यापुढेही लाभेल. आबा म्हणजे आमच्यासाठी “मोठा भाऊ’ जो भक्कमपणे प्रत्येक संकटावेळी मागे उभा आहे, अशी वेळी कितीही संकटे आली तरी फक्त महेंद्र आबांमुळेच लढण्याची ताकद व जिद्द मिळते. आमच्या भागात सामान्यांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या पठारे कुटुंबांमध्ये महेंद्रआबा यांच्या कामाची पद्धतही सामान्य माणसाच्या मनाला भिडणारी आहे, याची कित्येक उदाहरणे आज समाजात आहेत. गरजवंताला मदतीचा हात, ज्येष्ठांना मानसन्मान, तरुणांना मार्गदर्शन आणि चिमुकल्याना शिक्षणाचा आग्रह करताना महेंद्रआबांच्या दातृत्वाचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. यातील एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो की, शाळेच्या कामासाठी आबांकडे पालकांसोबत आलेल्या विद्यार्थ्याला आबा मनात येईल तो पाढा आवर्जून म्हणायला सांगतात आणि तो जर त्याने बिनचूक बोलून दाखवला म्हणजे त्याचे काम हे लगेच झालेच म्हणून समजा, असे हे आमचे आबा! नागरिकांच्या कामासाठी वेळप्रसंगी प्रशासनाला धारेवर धरून खराडी भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावणाऱ्या अशा नेतृत्वाचा वचक अनेक अधिकाऱ्यांमध्ये जाणवतो, त्यामुळे अशा अबालवृद्धांमध्ये लाडक्या असणाऱ्या नेतृत्वाला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या!!!